॥ श्री रामदूत हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार ॥
॥ श्री रामदूत हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार ॥
लालबाग परिसरातील हनुमान सेवा मंडळ, भंडार (महाप्रसाद) यांच्या वतीने यंदाची हनुमान जयंती अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पवित्र उत्सवानिमित्त भगवान हनुमानाच्या पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भक्तांना आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेता यावा यासाठी विशेष सजावट, भजन-कीर्तन तसेच आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद (भंडारा) ठेवण्यात आला असून, सर्वांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे. या निमित्ताने समाजात एकोप्याची भावना वृद्धिंगत होऊन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होत आहे.
सदर कार्यक्रमाचे ठिकाण पेरू चाळ, ११/१२ पटांगण, हनुमान सेवा मंडळ, लालबाग, मुंबई – १२ येथे असून, परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant