दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम नकार
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम नकार
मुंबई - मुख्य मुंबईतील कोकणवासियांसाठी अतिशय सोयीची असणारी दादर- रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास कोकण रेल्वेने ठाम नकार दिला आहे. खरतर ही गाडी रद्द करण्यात आली नसून कोरोनाकाळात दादर ऐवजी दिवा स्थानकातून सोडण्यात येत आहे. ती पुन्हा दादरहून सुरू करणार नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिवा-रत्नागिरी ही पॅसेंजर सुरु केल्यामुळे मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची भूमिका मनसेने मांडली होती. मात्र मध्य रेल्वेने याबाबत महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्टेशनच्या उपनगरी मार्गावरून मुख्य मार्गावर जाताना सहा रूळांचे क्रॉसिंग करावे लागत होते. परिणामी साधारणतः सात ते आठ लोकल थांबवाव्या लागत होत्या. लोकलच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत असल्याने ही ट्रेन दिवा स्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनानंतर 2021 मध्ये दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर दिवा स्थानकावर शिफ्ट केली. याचं मुख्य कारण असं की,दिवा स्थानकावर या पॅसेंजरला क्रॉसिंग देताना इतर लोकल ट्रेनचा खोळंबा होत होता. या पॅसेंजरच्या वेळेमुळे सात-आठ लोकल गाड्यांना थांबवाव लागत असे. यादरम्यान मध्य रेल्वेने लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ केली. यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करुन आता फक्त दिव्यावरुन रत्नागिरीला जाणार असल्याच रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण 21 गाड्या प्रतिदिवशी जात आहेत. यापैकी सहा गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आठ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, एक गाडी दादर, चार गाड्या कल्याण आणि दोन गाड्या दिवा स्थानकावरून चालवल्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade