महिलांसाठी आरोग्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
महिलांसाठी आरोग्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पोलादपूर - स्टारटेमप्रो ट्रेडलिंक प्रा. ली. आणि समृद्ध शिक्षण संस्था यांच्या वतीने बालाजी हॉटेल, लोहारमाळ, पोलादपूर येथे आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी नारी सुरक्षा अभियान मार्फत, आरोग्य जागरूकता आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाला पोलादपूर महाड परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात महिलांना आरोग्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्टारटेम प्रो कंपनीचे चेअरमन श्री. संजय पाटील सर यांनी उपस्थित महिलांना स्वतःच्या आरोग्य विषयी आणि स्वतःचे व्यवसाय कशाप्रमाणे आपण करू शकतो याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन करत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी स्टारटेम कंपनीचे प्रतिनिधी अरविंद पाटील सर , टीम लीडर समीर मालगुणकर सर तसेच नारी शक्ती अमृता भरणे मॅडम, प्रिया देशमुख मॅडम, सलोनी मालगुणकर मॅडम, निशिगंधा कदम मॅडम यांनी महिलांना स्वयंरोजगार आणि आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत व्यवसायातील संधी बद्दल स्पष्ट स्वरूपात माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन स्थायीक गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं नेतृत्व करत असलेले श्री नारायण कळंबे साहेब आणि मयुरी शिंदे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या आयोजन केले. त्यांनी महिलांनी स्वतःहून व्यवसाय क्षेत्रात उतरून स्वतःची नवी ओळख निर्माण करावी, असे चांगले विचार आलेल्या महिलांसमोर मांडले.
कार्यक्रमात सहभागी महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा कार्यक्रमांचे अधिक प्रमाणात आयोजन व्हावे, अशी अपेक्षा स्टारटेम कंपनीचे मालक आणि आयोजकांकडे व्यक्त केली. तसेच अनेक महिलांनी स्टारटेमप्रो कंपनीसोबत काम करून स्वतःची व आपल्या परिसरातील इतर महिलांची आरोग्य शिबिर मध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर