रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजिक्शन
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजिक्शन
उमरखेड - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात माकडाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा तांत्रिक बिघाड किंवा अपघात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वन विभागाच्या शूटरने माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गनने निशाणा साधला होता. मात्र, नेमके त्याच वेळी माकडाने अचानक हालचाल केली आणि शूटरचा अंदाज चुकला. गनमधून सुटलेले बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) माकडाला लागण्याऐवजी तिथे गर्दीत उभ्या असलेल्या सदानंद खराटे या 45 वर्षीय नागरिकाला जाऊन लागले.
वन विभागाच्या या गंभीर चुकीमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade