राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट
राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट
मुंबई - वाहन खरेदी करताना आता अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयकात सुधारणा करण्यात आली असून पर्यावरण कर म्हणून आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. विधिमंडळामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यात आली असून एकमताने मंजुरी दिली आहे. राज्यात पर्यावरण संरक्षण, औद्योगिक विकास साधण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं. वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदुषण करणाऱ्या वाहनांवर आता पर्यावरण कर वाढवण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आहे. या नवीन पर्यावरण करामुळे राज्याला दरवर्षी सुमारे १६० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे.
आतापर्यंत दुचाकीवर आता २००० रुपये पर्यावरण कर आकारला जात होता, तो आता ४ हजार रुपये आकारला जाणार आहे. पेट्रोल वाहनांसाठी ३००० रुपये आकारला जात होता, तो कर आता ६ हजार रुपयांवर करण्यात आला आहे. तर डिझेल वाहनांसाठी ७ हजार रुपये कर आकारला जाणार आहे. हाच कर आधी ३५०० रुपये होता. पर्यावरण कर हा ५ वर्षांसाठी एकरक्कमी आकारला जाणार आहे.
दरम्यान आता प्रदुषण कमी करण्यासाठी आता जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर ३० टक्क्यांपर्यंत जास्त टॅक्स भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे जे लोक आपली जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देणार आहे. यापुढे राज्यामध्ये ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहे त्यांना ग्रीन टॅक्स दुप्पट भरावा लाागणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant