स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार
स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दिवेश अवधूत हडकर याचा मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे लॅपटॉप देण्यात आले होते.
घाटकोपर पंतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनाला भांडुप प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी दिवेश अवधूत हडकर याला लॅपटॉप भेट देऊन त्याच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे लॅपटॉप देऊन हा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढे नेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे जग झपाट्याने बदलत असून या बदलत्या काळात शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा पाया भक्कम होत असून समाजाच्या प्रगतीसाठीही शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन पुढील पिढीलाही त्याचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यातही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant