सुनहरी यादे बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न
सुनहरी यादे बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुंबई - … सुनहरी यादे… अवीट, सुमधुर, सुरेल, बहारदार गाण्यांचा भरगच्च कार्यक्रम नुकताच संकल्प मेधा, संकल्प सोसायटी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
स्थानिक गायक कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने १६ नोव्हेंबर २०२५ पासून त्यांनी गायक / गायिकांना एकत्रित करून सुनाहरी यादे… कॅराॅवके ट्रॅक स्टेज शोसाठीचा सराव सुरु केला. त्याच्याच शुभारंभचा प्रथम शो काल दिनांक १४ मार्च,२०२६ सादर केला.
सुनहरी यादे… वो दौर… वो नगमे.. वो एहसास या सन १९५० ते १९९० या दशकातील चित्रपट गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, नायक, नायिका यांना मानवंदना देण्यासाठी गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
गायक, वादक, मुख्य सूत्रधार- रश्मिन मोरे यांच्या काटेकोर नियोजनानुसार विनय वाघ, रश्मिन मोरे, मुकेश सुर्वे, दिलीप डोके,आनंद सिहं, दिगंबर माजाळीकर, विजय चारी, प्रवीण पावस, अर्चना सावंत, नलिनी भारद्वाज, शालिनी शेट्टी, वृषाली देसाई, चैत्राली वानरकर, व रंजना शेट्टी या कलाकारांनी बहारदार गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गायक कलाकार व रश्मिन मोरे यांच्या पत्नी – ऋतुजा मोरे यांनी अपार मेहनत घेतली होती.
या सोहळ्यास रश्मिन मोरे यांच्या भगिनी – वृषाली पाटील, मिमिक्री आर्टिस्ट – संजय केणी, प्रसिद्ध गायिका – उत्तरा केळकर यांची कन्या – मानसी केळकर- तांबे , ज्येष्ठ पत्रलेखक – पत्रकार – बाळ पंडित उपस्थित होते.
उपस्थित पाहुणे व गायक / गायिकांना सन्माचिन्ह, प्रशस्तीपत्रक व तुळस रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
निवेदन – सौ. सीमा सावंत यांनी केले. वैष्णवी कुरुप यांचे विशेष सहकार्य लाभले.
गायक कलाकार दिगंबर माजाळीकर व आनंद सिहं यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकंली. विभागातील रसिक श्रोत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant