LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा
LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा
पर्यावरण
पुणे - देशभरातील नागरिक गॅसचा टंचाईने त्रस्त असताना पुण्यातील शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजी (LPG) ला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश आलं असल्याचा दावा केला आहे.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या टीमने वीस वर्ष संशोधन करून हा गॅस तयार करण्यासाठी लागणारे उत्प्रेरक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळवलं आहे. या उत्प्रेरकापासुन तयार झालेल्या DME गॅसचे व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यात देखील यश आलं असून सध्या पायलट प्रोजेक्टमधे दररोज अडीचशे किलोच्या प्रमाणात तो तयार होत आहे. औद्योगिक कंपन्यांसोबत करार करुन या गॅसच मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास हा गॅस LPG मधे आठ टक्के इतक्या प्रमाणात मिसळता येणार आहे. त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
डायमिथाईल इथर अर्थात DE गॅस भारतीय बनावटीच्या उत्प्रेरकापासुन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. LPG पेक्षा हा गॅस शुद्ध असल्याने या गॅसची फ्लेम पारदर्शक असते ज्यामुळे हा गॅस पर्यावरणपूरक ठरतो. हा गॅस स्वतंत्र देखील वापरता येतो आणि LPG मधे आठ टक्के मिसळून देखील त्याचा वापर करता येतो. DME गॅस मुळे LPG वरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत LPG पेक्षा कमी ठेवता येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant