‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ स्पर्धेच्या पुणे ऑडिशन संपन्न*
‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ स्पर्धेच्या पुणे ऑडिशन संपन्न
पुणे प्रतिनिधी : स्मृती एंटरप्राईझेसच्या वतीने आयोजित ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स आज सॅफ्रॉन बॅन्क्वेट्स येथे उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सहभागी महिलांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा स्वातीताई पोकळे,स्मृती एंटरप्राईझेसच्या संचालिका स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे उपस्थित होते. आयोजकांनी स्पर्धेच्या संकल्पनेविषयी माहिती देत महिलांना व्यक्तिमत्त्व विकास, फॅशन, मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रात पुढे जाण्याच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत 18 ते 55 वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. पुणे ऑडिशन्समध्ये ८० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपली कला आणि व्यक्तिमत्त्व सादर केले. निवड झालेल्या स्पर्धकांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले.
महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याची भावना अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली आणि स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ दिल्या.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्यांना एकूण 12 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 40 स्पर्धकांना स्मृती एंटरप्राईझेस आणि पेंटेन स्टुडियोज प्रस्तुत ‘जयोस्तुते’ या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध सहा शहरांमध्ये पुढील ऑडिशन्स आयोजित करण्यात येणार असून त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये भव्य ग्रँड फिनाले मुंबई मध्ये पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धेचे परीक्षण अश्मीक कामठे, जयेश पाटील, सोपान शेडगे, सौम्या नायर, केतन आरमरकर, जयश्री एम यांनी केले तर सूत्रसंचालन कोमल, तनुजा यांनी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर