विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करा, पद्माकर चंदनशिवे यांची मागणी
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करा, पद्माकर चंदनशिवे यांची मागणी
मुंबई - विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती आणि शहीद किंवा अकस्मित मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांना किंवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर एक सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी एल्गार सैनिक एकता मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आझाद मैदान येथे नुकतेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभाग घेत आहेत.
मागील एक वर्षापासून सैनिकांच्या प्रमुख दोन मागण्यांकरीता सरकारशी पत्रांदारे संपर्क करन्यात आला. त्यास सरकार कडून कसलाही प्रतिसाद न आल्यामुळे मागील वर्षी राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे राज्यातील माजी सैनिक व सैनिक परिवारा व्दारे धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले. मागण्यांचे निवेदन एल्गार मंचाच्या शिष्टमंडळा व्दारे सैनिक कल्याण मंत्री मा. नामदार शंभुराजे देसाई यांची भेट घेवून देण्यात आले होते.
परंतु सरकार व्दारे त्या मागण्या वर अजून पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सरकारच्या, सैनिकांच्या व सैनिक परिवाराच्या प्रती या उदासीन पूर्ण व्यवहारामुळे एल्गार सैनिक एकता मंचाच्या वतीने आम्ही या अधिवेशनामध्ये विधान भवन वर धडकणार.
राज्यपाल कोट्यातून कमीत कमी दोन माजी सैनिकांना आमदार म्हणून विधानसभेवर पाठविणे.
शहीद झालेल्या किंवा सेवेच्या दरम्यान अकस्मित मृत्यू पावलेल्या सैनिकाच्या पत्नीला किंवा पाल्याला अनुकंपा तत्वावर राज्य सरकारने सरकारी नोकरी प्रदान करणे.
सरळ सेवा नोकरीमध्ये माजी सैनिकांचा पंधरा टक्के आरक्षित कोटा हा इतरत्र वर्ग न करता माजी सैनिकांनाच मिळावा. या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन तेवढं करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष कमलेश्वर दाभाडे आणि प्रवक्ते वीरनारी सुचिता भोयर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade