अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर
अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर
अंबरनाथ - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील हजारवर्षे जुने शिवमंदिर प्रदुषित वालधुनी नदी आणि मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण यांमुळे ग्रासून गेले आहे. यामुळे आता उशीराने का होईना पण भानावर येत राज्य सरकारने मंदिर परिसराचा विकास आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. आहे. या ठिकाणी सरकारकडून 550 कोटींचं कॉरीडोअर उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. विकास कामासाठी या मंदिरा लगतच्या 32 नागरिकांची घरे तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध केला आहे. या कारवाई दरम्यान दगडफेक करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. विकासकामे करण्यापूर्वी आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी बाधित रहिवाशांनी केली
प्रशासनाने संबंधित रहिवाशांना कारवाईपूर्वीच नोटिसा पाठविल्या होत्या. घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कारवाईला रहिवासी प्रचंड विरोध करत आहे.आधी आमचे पुनर्वसन करा.त्यानंतर विकास कामे करा.आमचा विकासाला विरोध नाही. अशी भूमिका बाधित रहिवाशांनी घेतली आहे.प्रशासनाकडून बुलडोझर घेऊन तोडू कारवाई करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर