मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण
नवी दिल्ली -नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या समिटमधील ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित ‘कुंभदूत’ या एआय-आधारित ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी अनावरण करण्यात आलेले कुंभदूत ॲप आगामी महाकुंभमेळ्यासाठी ‘हाय-टेक सारथी’ म्हणून ओळखले जाईल. लाखो भाविकांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांच्या समन्वयासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहे. या ॲपमुळे भाविकांना रिअल-टाइम माहिती मिळण्यासोबतच प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने अचूक नियोजन करणे सुलभ होणार आहे.
डिजिटल इंडियाच्या ध्येयाला गती देत महाराष्ट्र राज्य आता एआय क्रांतीमध्ये आघाडीवर असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे
मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त नाशिक प्रवीण गेडाम यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या एआय समिटमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनने केवळ तांत्रिक संकल्पना न मांडता प्रत्यक्ष प्रशासनात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर कसा केला जातो, याचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. माहिती तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंह, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आणि भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रदर्शनाचे स्टार्टअप्स आणि धोरणकर्त्यांकडून कौतुक होत आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार’, गुंतवणूकदारांसाठी ‘मैत्री व उद्योग मित्र’ चॅटबॉट, सायबर सुरक्षेसाठी ‘महाक्राइम ओएस’ आणि आरोग्य सेवेसाठी ‘मार्व्हल’ (Marvel) ज्युनियर डॉक्टर चॅटबॉट यांसारख्या क्रांतिकारी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच शासकीय विभागांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘महाजीपीटी’ या विशेष एआय टूलचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant