कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्त
कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्त
मुंबई,- मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यात मुंबई कोस्टल रोडवर अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70 किमी वेगाने या रस्त्यावरून वाहन नेल्यास ‘जय हो’ ची धून ऐकू येण्याचे कुतूहल लगेचच ओसलले आहे. कारण या सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या मेलडी रोडला विरोध केला जात आहे. सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे त्रास होत असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे. ब्रीच कँडी परिसरातील ६५० कुटुंबीयांनी सांगितलं, सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत या रस्त्यावर गाणी सुरू असतात. या रस्त्यावरुन सतत गाड्याची वर्दळ असते. त्यामुळे सतत गाणं वाजत असतं. या आवाजाचा आम्हाला त्रास होतो.
या परिसरात शाळा आणि रुग्णालयं असून रात्रीच्या वेळी आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे घराच्या खिडक्याही उघड्या ठेवता येत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. परिणामी रहिवाशी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade