काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त विधान – टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त विधान – टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी
मुंबई - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
मालेगावात महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने आणखी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचे आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. त्यांच्या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade