उपमहापौर परशुराम वाडेकर यांची बोपोडी व औंध रोड भागातील रुग्णालयांना भेट
उपमहापौर परशुराम वाडेकर यांची बोपोडी व औंध रोड भागातील रुग्णालयांना भेट
पुणे - पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बोपोडी व औंध रोड परिसरातील महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या दौर्यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.
बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय येथे पाहणी करताना रुग्णालय तातडीने युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत यंत्रसामग्री, आवश्यक सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
यानंतर कै. द्रोपतीबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालय येथेही पाहणी करण्यात आली. येथे आवश्यक सुधारणा व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
औंध रोडवरील बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना येथे केवळ ओपीडीपुरती मर्यादा न ठेवता, खेडेकर रुग्णालयाच्या धर्तीवर प्रस्तुतीगृह, फिजिओथेरपी सेंटर, रुग्णवाहिका तसेच एक्स-रे सुविधा सुरू करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.
या पाहणीवेळी आरोग्य अधिकारी डॉ. मीना बोराडे, परिमंडल क्रमांक २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश बगाडे तसेच शेवाळे दवाखान्याच्या डॉ. मैथिली कुलकर्णी उपस्थित होत्या. याशिवाय संबंधित कर्मचारी व स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर वाडेकर यांनी “नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे,” असे नमूद करत सुधारणा कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant