धक्कादायक – 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा विक्रीला
धक्कादायक – 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा विक्रीला
नाशिक - मराठ भाषेला नावापुरताच अभिजात दर्जा देऊन राज्यभरातील मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करण्याचा सरकारचा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यातच आज नाशिकमधून एक गंभीर घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळाच विक्रीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचं ही या प्रकारात समोर आलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांसह पालक ही आक्रमक झाले होते. त्यानंतर प्रशासनाचे याकडे लक्ष गेले.
या सर्व विक्री प्रकरणात गुजरात कनेक्शन ही समोर आलं आहे. शाळेच्या विक्रीसाठी गुजरात राज्यात मुक्तारपत्र तयार करण्यात आलं. या माध्यमातून विंचूर येथील शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित खरेदीदाराने शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारा विरोधात शाळेचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणाची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली. भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आंदोलनातून परत शाळेत पाठवण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर