उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी
पुणे - पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात उपमहापौर वाडेकर यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई–पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी दिल्या.
यावेळी औंध वार्ड कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, ए.एस.आय. विनायक चोपडे, संतोष शेलार, मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिवे यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी उपमहापौर वाडेकर यांनी जाणून घेतल्या. या सर्व समस्यांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade