आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक : शंका उपस्थित
आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक : शंका उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून काही शंका देखील उपस्थित केल्या
अजित पवारांच्या निधनानंतर आज पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून पाच प्रश्नांनी लक्ष देखील वेधलं आहे.
अमोल मिटकरी यांची पोस्ट
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे, त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!".
"मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे."
प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—
• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant