श्री मलंगगड विभागातील ४० गावांत हिंदू ऐक्याची महाआरती
श्री मलंगगड विभागातील ४० गावांत हिंदू ऐक्याची महाआरती
- श्री मलंग यात्रेच्या पार्श्वभूमीवर ४० गावांत धर्मजागरणाचा गजर
- माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यासाठी ४० गावांतून हिंदू भाविकांचे संघटित आवाहन
ठाणे : प्रतिनिधी
जया एकादशी निमित्त श्री मलंगगड विभागातील ४० गावांमध्ये एकाच वेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी या महाआरती आणि पालखी सोहळ्याच्या प्रचारासाठी आवाहन केलं होतं. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून हिंदू समाजातील ऐक्य व धार्मिक चेतना प्रकर्षाने दिसून आली आहे.
श्री मलंग यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या महाआरती कार्यक्रमात प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये सायंकाळी ७ वाजता नियोजित वेळेत आरती संपन्न झाली आहे. ग्रामस्थांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहत सहभाग नोंदवला आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने सर्वच ठिकाणी शिस्तबद्ध व भक्तीपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले आहे.
या महाआरतीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधत २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्याचे धार्मिक महत्त्व, शतकानुशतके चालत आलेली परंपरा आणि या सोहळ्यातून व्यक्त होणारी हिंदू संस्कृतीची ताकद याबाबत माहिती देण्यात आली आहे.
श्री मलंग गड परिसरातील ढोके,शिरवली, काकडवाल, मांगरूळ,करवले,उसाटणे,पोसरी,आंभे ,वसार,नेवाली, कुंभार्ली,शेलारपाडा, द्वारली आदी गावांमध्ये जया एकादशी निमित्त महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली आहे. या ठिकाणीही ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला आहे. अनेक गावांमध्ये यात्रेच्या तयारीसाठी स्वयंसेवक, नियोजन आणि सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
श्री मलंगगड विभागातील ४० गावांत एकाच वेळी झालेल्या या महाआरतीमुळे हिंदू समाजातील एकजूट, धार्मिक जागृती आणि यात्रेबाबतचा उत्साह अधिक दृढ झाला असून आगामी माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade