आजपासून WPL 2026 ला सुरुवात
आजपासून WPL 2026 ला सुरुवात
मुंबई- आजपासून महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 ची धमाकेदार सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील पहिला सामना DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे रंगला आहे. स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेचे सामने दोन सत्रात खेळवले जातील. पहिला टप्पा नवी मुंबईत आणि दुसरा टप्पा वडोदरा येथे होईल. 9 जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात ही स्पर्धा रंगणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) च्या विविध चॅनेलवर सामने पाहता येतील. मोबाईल/लॅपटॉपवर: जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य उपलब्ध असेल.
WPL 2026 सहभागी झालेले ५ संघ
मुंबई इंडियन्स -कर्णधार: हरमनप्रीत कौर
संघ: नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजाना, शबनीम इस्माईल, सायका इशाक, निकोला केरी, पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, संस्कृती गुप्ता, राहिला फिरदौस, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, नाल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - कर्णधार: स्मृती मानधना
संघ: ऋचा घोष, श्रेयंका पाटील, जॉर्जिया व्होल, नेडिन डी क्लार्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिन्से स्मिथ, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रत्युषा कुमार, दयालन हेमलता, सायली सातघरे.
दिल्ली कॅपिटल्स -कर्णधार: जेमिमा रॉड्रिग्स
संघ: शेफाली वर्मा, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, लॉरा वोल्व्हार्ट, चिनले हेन्री, स्नेह राणा, लिझेल ली, दिया यादव, तानिया भाटिया, ममता मडिवाला, नंदिनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मिन्नू मणी.
गुजरात जायंट्स -कर्णधार: ॲशले गार्डनर
संघ: बेथ मुनी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग ठाकूर, भारती फुलमाळी, टिटास साधू, काशवी गौतम, कनिका आहुजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेअरहॅम, अनुष्का शर्मा, हॅपी कुमारी, किम गार्थ, शिवानी सिंग, डॅनी व्याट-हॉज, राजेश्वरी गायकवाड.
यूपी वॉरियर्स -कर्णधार: मेग लॅनिंग
संघ: श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, फोबी लिचफिल्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोभना, डिएंड्रा डॉटिन, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, क्लो ट्रायॉन, सुमन मीना, जी. त्रिशा, प्रतिका रावल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant