अंबरनाथ मधील बारा काँग्रेस नगरसेवक अखेर भाजपात
अंबरनाथ मधील बारा काँग्रेस नगरसेवक अखेर भाजपात
ठाणे दि ८ : अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत काँग्रेस कडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते.
अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तेथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसचे निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.या नगरसेवकांबरोबर अंबरनाथ मधील काँग्रेसचे विविध आजी-माजी पदाधिकारी ही भाजपात प्रवेश करणार आहेत . लवकरच हा प्रवेश पार पडेल अशी माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी बोलताना काँग्रेसचे अंबरनाथ चे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने बाजू मांडली . केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी केली होती. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली. त्यातूनच मग आमच्यावर पक्षाने विश्वासात न घेता कारवाई केली. केवळ अंबरनाथ शहराच्या विकासाकडे बघून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर