वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला
वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला
Mumbai Crime News : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हेगारी स्वरुपाच्या धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नेते कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. अशातच मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर इथे हा हल्ला झाला आहे. प्रचार सुरु असताना अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. या घटनेनंतर तात्काळ हाजी सालिम कुरेशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात ऊपचार सुरु आहे.
बांद्रा परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला.आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. जखमी उमेदवारावर महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं वांद्रे परिसरामध्ये भीतीच्या आणि तणावाच्या वातावरण निर्माण झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्ला करणारा व्यक्ती कोण होता. हल्ला करण्याच्या मागे हेतू काय होता. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज राजकीय नेते प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रतारादरम्यान, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. काही भागात हल्ले होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला असून माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईत देखील देखील शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant