मनसे नेते हत्या प्रकरणात आरोपी ..., शालन शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मनसे नेते हत्या प्रकरणात आरोपी ..., शालन शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
सोलापूर : मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात भाजप उमेदवार आरोपी शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सरवदे यांच्या हत्या प्रकरणात शालन शिंदे यांची नेमकी काय भूमिका होती, याची खोलवर चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून हत्या केल्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. शालन शिंदे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांकडून भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत कुठेही चटणीचा पुरावा न आढळल्याने शालन शिंदे यांना वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली नाही, अशी माहिती वकिलांची दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर