महापालिका निवडणूक २०२६ - महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के
महापालिका निवडणूक २०२६ - महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक विनोद भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला सोलापुरात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात 40 आमदार आणि 12 खासदार ठाकरे यांच्या विरोधात गेले होते. त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोलापुरात पहिले कॅम्पेन गणेश वानकर यांनीच उभे केले होते. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तारखांसाठी वानकर यांना आजही न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant