अजित पवारांच्या पक्षाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी
अजित पवारांच्या पक्षाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी
पुणे - पालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे, अशातच त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडेवर दोन हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत असं असताना प्रभाग क्रमांक 9 मधून अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप सिद्धार्थ विरोधात लढणारे काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारेंनी केला आहे. पण अजित दादांना या गुन्ह्याची कल्पना आहे अन मला यात अद्याप दोषी ठरवलं नाही, असा दावा सिद्धार्थ बनसोडेंनी केला आहे.
उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती सिध्दार्थने दिली आहे. 2021मध्ये दोन हाफ मर्डरचे, दंगा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे आणि ते गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अर्ज छाननीमध्ये ही माहिती पाहून खंदारे हे आरोप करत आहेत. असे उमेदवार देऊन अजित पवार जिल्हा गुन्हेगारी मुक्त कसे करणार आहेत? असा प्रश्न खंदारे उपस्थित करत आहेत. मात्र हे या गुन्ह्यात मला अद्याप दोषी ठरविण्यात आलेलं नाही. तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ काय, आता मी वडिलांच्या सोबतीनं विकास कामांवर भर देत आहे. अजित दादांचे गुन्हेगारी मुक्त शहर करण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करु. असा दावा ही सिध्दार्थने केला.
कुख्यात गुंड आंदेकरांच्या घरात दोघींना तिकीट - अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली (Sonali Andekar) आणि लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणेची (Gaja Marne) बायको जयश्री मारणेला हिलादेखील पुण्यातून (Pune news) उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन, या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant