अहिल्यानगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगर : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या म्हणून लक्ष लागलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे बाद झालेल्या अर्जामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) अहिल्यानगरमधून विजयाचा खातं उघडलं. येथील राष्ट्रवादीचे कुमार वाकळे बिनविरोध निवड झाले आहेत.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सहकार्य केले आणि शिवसेनेच्या रोहिणीताई शेंडगे या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर झाल्या. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महानगरपालिकेतील नगरसेवकांचे पक्षीय समीकरणही मोठ्या प्रमाणावर बदलले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade