NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार

नाशिक - येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत.

करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा/इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक या पदांसाठी 13 मार्च 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सात जणांनी संगनमत करून डमी परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पाठवले. या डमी उमेदवारांनी त्यांच्या जागी परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले.

परीक्षा पास झाल्यानंतर, आरोपींनी बनावट आयटीआय प्रमाणपत्रे आणि विद्युत अभियांत्रिकीतील (इलेक्ट्रीकल) डिप्लोमाची बनावट कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवली. या फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर प्रकरण झिरो एफआयआरच्या स्वरूपात मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

सर्व आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस विविध राज्यांत शोधमोहीम राबवत आहेत. पवई पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्याचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा किंवा रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट