प्रयागराजमध्ये मुलीचे धर्मांतर करुन दहशतवादी बनवण्याचा कट उघड
प्रयागराजमध्ये मुलीचे धर्मांतर करुन दहशतवादी बनवण्याचा कट उघड
प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी केरळमधील एका दहशतवादी गटाचा कट उघडकीस आणला आहे. या गटाचे कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती. हा गट दलित मुलींना फूस लावून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असे, त्यानंतर त्यांना जिहादी प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवत असे. मात्र, या दहशतवाद्यांकडून एक चूक झाली आणि ती त्यांच्यावरच भारी पडली. एक दलित मुलगी त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा खुलासा झाला. पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. एका आरोपीचा शोध सुरू असून, या संपूर्ण नेटवर्कचाही तपास केला जात आहे.
गंगा नगरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) कुलदीप सिंह गुनावत यांनी सांगितले की, या प्रकरणात दरकशा बानो आणि मोहम्मद कैफ नावाच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला केरळहून प्रयागराजला आणून ‘वन स्टॉप सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीने सांगितले की, या टोळीत अनेक महिला सदस्य आहेत. तिच्या शेजारी राहणारी एक महिला तिची मैत्रीण होती. तिनेच तिला फिरण्याच्या बहाण्याने केरळला पाठवले. तिथे नेऊन त्यांनी तिला जिहादचे प्रशिक्षण देणे सुरू केले. ती कशीतरी तिथून पळून गेली आणि कुटुंबाला फोन केला.
26 जून रोजी पीडित मुलीच्या आईने फुलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात दरकशा बानोने त्यांची १५ वर्षांची मुलगी 8 मे रोजी फूस लावून आपल्यासोबत घेऊन गेल्याचे म्हटले होते. त्यानंतर मोहम्मद कैफने त्या अल्पवयीन मुलीला बाईकवरून प्रयागराज जंक्शनपर्यंत पोहोचवले. या दरम्यान, त्याने मुलीसोबत छेडछाडही केली. त्यानंतर बानो तिला ट्रेनने आधी दिल्लीला घेऊन गेली आणि तिथून केरळला घेऊन गेली, जिथे तिने अल्पवयीन मुलीला काही संशयित लोकांशी भेटवले.
या प्रकरणाच्या गौप्यस्फोटानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलीस आता प्रयागराजपासून केरळपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरु केलाय. पोलीस दहशतवाद्यांशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आम्हाला अजूनही अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती पीडित कुटुंबीयांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant