प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाने विषारी इंजेक्शन टोचून संपवले आयुष्य
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाने विषारी इंजेक्शन टोचून संपवले आयुष्य
अकोला - येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर