आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत मराठी चित्रपटांचा वाजणार डंका!
- by
- Sep 01, 2018
- 1211 views
मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणार्या फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या फिल्मीदेश’ उपक्रमान्वये, भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यामुळे, परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेली सविता दामोदर परांजपे’, बोगदा’ आणि टेक केअर गुडनाईट’ हे तीन मराठी चित्रपट पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत उतरवली जात आहेत.
चित्रपट मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नितीन केणी यांचा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी सिनेमांसाठी भविष्यात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. नितीन केणी यांचे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मिती आणि वितरणक्षेत्रात मोठे योगदान आहे. गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमांसाठी आणि सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ते झी स्टुडियोचे माजी सीईओ असून, ‘झी स्टुडियो’ ला नव्या उंचीवर नेण्यास त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे, मराठी चित्रपटसृष्टीची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘फिल्मीदेश’ द्वारे त्यांनी उचलेले हे धाडसी पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय, या कार्यात जागतिकस्तरीय बृहन्महाराष्ट्र मंडळ चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ‘फिल्मीदेश’ द्वारे प्रदर्शित होणार्या सर्व चित्रपटांच्या विदेशी प्रसारणात आशिष चौघुले यांचा हातभार लागणार आहे. फिल्मीदेश’ या उपक्रमाची नांदी बोगदा’, सविता दामोदर परांजपे’ आणि टेक केअर गुडनाईट’ या तीन मराठी सिनेमांपासून होणार आहे. हे सिनेमे फिल्मीदेश’ द्वारे जगभरात दाखवले जाणार असून, या सिनेमांच्या वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भविष्यातील इतर मराठी चित्रपटांचा विदेशी प्रचारदेखील याचपद्धतीने केला जाणार असून, याद्वारे, चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूकदेखील सत्कारणी लागणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya