NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

स्पेनच्या नागरिकांनी राजा-राणींवर केली चिखलफेक

स्पेनच्या नागरिकांनी राजा-राणींवर केली चिखलफेक

मद्रीद - युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात मात्र वेळप्रसंगी त्यांना जाबही विचारतात. देशाप्रती त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतात. स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलन्सिया भागाला भेट देण्यासाठी आलेले राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त नागरिकांनी चिखल फेकला आहे. पूर रोखण्यात अपयशी ठरल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी किलर आणि शेम ऑन यू अशा घोषणा दिल्या. राजा फिलीप यांच्यासोबत स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझही उपस्थित होते. त्यांच्या गाडीवरही लोकांनी हल्ला केला.पूर रोखण्यासाठी सरकारने आधीच उपाययोजना का केल्या नाहीत,असा सवाल नागरिकांनी सांचेझ यांना विचारला.

नागरिकांनी पंतप्रधान सांचेझ यांच्या गाडीवर हल्ला करताच त्यांचे सुरक्षा रक्षक पुढे सरसावले. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. या प्रकारामुळे राजा-राणी आणि पंतप्रधानांना आपला दौरा अर्धवट सोडून राजधानीला परतावे लागले.स्पेनमध्ये पुरामुळे हाहाःकार माजला असून आतपर्यंत पुरामुळे २१७ जणांचा बळी गेला आहे. अवघ्या आठ तासांत वर्षभराएवढा पाऊस झाल्याने स्पेनमध्ये पुराने पन्नास वर्षांचा विक्रम मोडला. मुसळधार पावसाने अचानक पूर आला. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधीही मिळाली नाही.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट