बारामतीचा सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता
बारामतीचा सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता
मुंबई:- अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बिग बॉसच्या पाचव्या सीजनचा निकाल लागला असून बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. सुरवातीपासून अनेकांची नाराजी ओढावून घेणारा, ज्याला बिग बॉसचा गेम समजत नाही अशी टीका होत असलेला सूरज चव्हाणने अखेर बाजी मारली आहे. सूरज चव्हाणवर आता बक्षीसांचा वर्षाव झाला असून एका क्षणात तो लखपती झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. रिल स्टार असलेला सूरज चव्हाण हा यापूर्वीच गावा गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला होता. सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलं आहे. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं. बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya