Breaking News
मराठी शब्दाचा उच्चार चुकीचा केल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी
मुंबई - बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं मराठी बोलल्याने अमिताभ यांनी चाहत्यांची माफी मागत हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी “मी कचरा करणार नाही” असं म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचं आवाहन केलं होतं.
पण, हा व्हिडिओ करताना मराठी बोलण्यात बिग बींकडून चूक झाली होती. सुदेश भोसले यांनी सांगितल्यानंतर बिग बींच्या ही चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ शेअर करत चुकीचं मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. तसंच या व्हिडिओत त्यांनी त्यांची चूकही सुधारली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar