मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भारताला हॉकीमध्ये कांस्यपदक, वीनेश फोगट निवृत्त

भारताला हॉकीमध्ये कांस्यपदक, वीनेश फोगट निवृत्त

 Paris Olympic:    

पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. त्याचबरोबर भारताचे हे एकूण चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय देशाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आज भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीयहॉकी संघाने विजय मिळवल्यावर मनप्रीत सिंगने हे कांस्यपदक श्रीजेशला समर्पित केल्याचे सांगितले. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. अखेरच्या सामन्यात श्रीजेशने दमदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे श्रीजेश या पदकाचा खरा हकदार आहे, असे यावेळी मनप्रीतने सांगितले. श्रीजेशने भारतासाठी आतापर्यंत अविस्मरणीय कामगिरी केली आहे. भारतीय हॉकीतील न विसरता येणारे नाव हे श्रीजेशचे नक्कीच असेल. त्यामुळे त्याने आतापर्यंत केलेल्या भारतीय हॉकीच्या सेवेसाठी त्याला हे पदक समर्पित केल्याची भावना सर्वांच्याच मनात होती.

या सामन्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाला की, ” भारताच्या हॉकी संघात काही खेळाडूंचे जे वय आहे, त्यापेक्षा जास्त वर्षे श्रीजेश हा भारतासाठी हॉकी खेळला आहे. त्यामुळे त्याचे भारतीय हॉकीमधील योगदान हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा फारच भावूक क्षण आहे. कारण आमच्या संघातील एक सर्वात महत्वाचा व्यक्ती यापुढे आमच्यबरोबर मैदानात नसेल. पण श्रीजेशने भारतीय हॉकीसाठी जे काही केले आहे, त्यालाच तोडच नाही.” सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत (८ ऑगस्ट) ४ पदके जिंकली आहेत. चारही कांस्यपदके मिळवली आहेत. मागील तीन कांस्यपदके नेमबाजीत जिंकली आहेत. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकेरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत दुसरे कांस्य मिळवले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. आता हॉकीमघ्ये भारताला चौथे कांस्यपदक मिळाले आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट