प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ ने पार केला हजार कोटींचा टप्पा
प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ ने पार केला हजार कोटींचा टप्पा
मुंबई -‘कल्की : २८९८ एडी’ ( Kalki: 2898AD ) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर १ हजार कोटी कमाईचा टप्पा पार करत विशेष कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या १६ व्या दिवशीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या उत्तर भागात अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, दक्षिणेत ‘इंडियन २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, ‘कल्की : २८९८ एडी’ने भारतात १६ व्या दिवशी ५.२ कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच हा चित्रपट प्रभास ( Prabhash ) च्या पुनरागमनासाठी महत्वाचा मानला जात आहे. ‘कल्की’ने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून, गेल्या वर्षी किंग खानच्या ‘पठाण’ व ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी जागतिक स्तरावर हा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले होते.
विष्णूच्या दहाव्या अवताराची ही गोष्ट असून, विज्ञान आणि पौराणिक कथेचा योग्य संगम या चित्रपटात दाखविल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी या चित्रपटाचे कौतुक केल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. हा चित्रपट विविध भाषांत प्रदर्शित झाला असून, तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत २५५ कोटी, तर हिंदी भाषेत २३६ कोटींची कमाई केली आहे.
‘नाग अश्विन’ दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ५४८ कोटी रुपयांची कमाई केली असून, शनिवारी हा आकडा ५५० कोटींचा टप्पा पार करील आणि रविवारी रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने भारतात केलेल्या ५५३ कोटींचा विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE