मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक

मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक  

मुंबई, - वृद्ध व्यक्तींच्या भोळेपणाचा फायदा उचलून त्यांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली सर्रास पहायला मिळतात. मुंबईतील एका ७६ वर्षाच्या व्यक्तीला धाक दाखवून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोड परिसरात ७६ वर्षीय व्यक्ती पत्नीसोबत राहतात. तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी व्हॉट्स ॲपवर त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने वांद्रे गुन्हे शाखेतून संदीप राव बोलत असल्याचे सांगितले. आधारकार्डवरून कोणीतरी सिमकार्ड घेतले असून त्यांना आधारकार्ड पाठवण्यास सांगण्यात आले. त्यांनी आधारकार्डची दुय्यम प्रत आणि काही कागदपत्रे तक्रारदाराला पाठवली. त्यात नरेश गोयल विरूद्ध दाखल आर्थिक गुन्ह्यांत त्यांचाही सहभाग असल्याचे नमूद होते. कागदपत्रे पाहून त्यांना धक्का बसला . तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या एका कागदपत्रातही त्यांचे नाव दिसले.

अधिकाऱ्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे सांगून याबाबत कुणाकडेही वाच्यता करू नये असे बजावले. चौकशीदरम्यान खात्यातील सर्व रक्कम अधिकाऱ्याने सांगितलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली. तपास यंत्रणांची नावे घेऊन १२ एप्रिल ते २० एप्रिलदरम्यान त्यांना २ कोटी १८ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

यावेळी, मुंबई गुन्हे शाखा, आरबीआय, सर्वोच्च न्यायालय, प्राप्तीकर विभाग, ईडी अशा विविध यंत्रणांच्या नावाचा वापर करून बनावट नोटीस पाठवून, नरेश गोयल गुन्ह्याशी संबंध असल्याचे भासवून ७६ वर्षीय तक्रारदाराचे बँक खाते रिकामे करण्यात आले. अखेर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, दक्षिण सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट