बसंती जैन यांचा सन्मान
सामाजिक क्षेत्रातील अतुलनिय कार्याबद्दल केला गौरव
पनवेल ः सामाजिक कार्यकर्त्या बसंती जैन यांचा 14 मार्च रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी कर्तृत्ववान महिलांचा सामान करत असतो. यंदाचे वर्षी बसंती जैन यांना गौरविण्यात आले.
महिला दिनाच्या औचित्याने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्याने समाजाला त्यांच्या कार्याची ओळख होते, तसेच त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवल्याने अनेक माता भगिनींना प्रेरणा मिळते असे विचार मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी व्यक्त केले. बसंती जैन यांनी सन्मान केल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंच चे आभार मानले तसेच त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने यापुढे अधिक ऊर्जेने काम करेन अशी भावना व्यक्त केली. बसंती जैन या पार्श्व वुमन या संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील गोर गरीब मुलांच्या उत्कर्षासाठी कार्य करत आहेत. तसेच पनवेल स्मार्ट मम्मीज या संस्थेच्या माध्यमातून देखील त्या समाजकार्य करतात. काटारा महिला प्रगती संघाच्या त्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आहेत. पोलीस दक्षता समितीच्या देखील त्या सदस्य आहेत. बसंती जैन यांच्या सन्मान सोहळ्याला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष माधव पाटील, माजी अध्यक्ष अविनाश कोळी, खजिनदार विवेक पाटील, माजी अध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, मंदार दोंदे, नितीन कोळी, राजू गाडे तसेच भाजपाचे पनवेल शहर खजिनदार संजय जैन आदी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya