पोलीस भरतीत महिला उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय
पोलीस भरतीत महिला उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय
मुंबई-: पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी अतिशय खडतर असते. या दिवशी मासिक पाळी आल्यामुळे महिला उमेदवारांना चाचणी देणे त्रासदायक ठरू शकते. यावर तोडगा म्हणून आता पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी संबंधित तरुणीला मासिक पाळी असल्यास त्यांना काही दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मैदानावरील आरोग्य पथकाच्या तपासणीनंतर तरुणीला 5 ते 6 दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यानंतर तिची शारीरिक चाचणी घेतली जाईल. मासिक पाळीदरम्यान होणारी तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर यामुळे अनेक तरुणींना धावण्यासह इतर शारीरिक चाचण्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करता येत नव्हती. तरुणींच्या याच नैसर्गिक अडचणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
आरोग्य तपासणीच्या आधारे उमेदवाराची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर तिला अतिरिक्त वेळ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संबंधित तरुणींनी अशा परिस्थितीत भरती प्रक्रियेतील अधिकृत नियम आणि सूचनांचे पालन महत्त्वाचे राहणार आहे. एखाद्या महिला उमेदवाराची परिस्थिती अधिक मुदत देण्याची असल्यास त्याचाही विचार करण्यात येणार आहे.
ही सुविधा नेमक्या कोणत्या भरती प्रक्रियेला लागू आहे, आरोग्य तपासणी कोण करणार आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील, याबाबतची सविस्तर अधिकृत माहिती उमेदवारांनी संबंधित भरती प्राधिकरणाकडून तपासून घ्यावी लागणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या तरुणींनी शारीरिक चाचणीची तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्य तपासणीसंबंधी नियम यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर