पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगचा परवाना FDA कडून तत्काळ रद्द
पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगचा परवाना FDA कडून तत्काळ रद्द
पुणे-: पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंगवर एफडीएने छापा टाकला आहे. . या कारवाईत बर्गर किंगचा परवाना एफडीएने रद्द केला आहे. बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या स्वच्छते संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रेस्टॉरंट मधील अस्वच्छता या कारवाईचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कँप येथील बर्गर किंग आऊटलेटला अचानक भेट देऊन पाहणी केली असता, तेथे अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
प्रचंड अस्वच्छता : किचन आणि अन्न साठवणुकीच्या जागी भीषण अस्वच्छता आढळली, जे कारवाईचे प्रमुख कारण ठरले.
अन्न मानकांचे उल्लंघन : खाद्यपदार्थ तयार करताना आणि साठवताना एफडीएच्या (FSSAI) नियमावलीचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे समोर आले.
आरोग्यास धोका : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने प्रशासनाने कोणताही विलंब न करता तात्काळ परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान एफडीएच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग आणि डॉमिनोजसारख्या एकूण 104 खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये अन्न सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं दिसल्यानंतर एफडीएने डॉमिनोज पिझ्झाचे तीन आऊटलेट्स बंद केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर