रिक्षा , टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ नाहीच
रिक्षा , टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ नाहीच
मुंबई -: राज्यामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि इतर व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेल्या मुदतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही अशी स्पष्ट ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. येत्या 17 तारखेला ज्यांनी मराठी भाषा शिकली आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असे देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे .
अनेक माध्यमांनी एक महिन्यांची मुदतवाढ मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या, त्यावर खुलासा करताना सरनाईक यांनी हे स्पष्ट केले आहे. 17 ऑगस्टला एकदा प्रमाणपत्रे दिल्यानंतर ज्या चालकांना मराठी भाषा येत नाही असे आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले, तर अशा चालकांना रीतसर नोटीस देऊन पुढील महिन्याभरात त्यांनी ती भाषा शिकावी अन्यथा त्यांचा परवाना तीन महिन्यासाठी निलंबित केला जाईल अशा स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत. या मुदतीनंतरही जे मराठी आत्मसात करणार नाहीत त्यांचा परवाना, ते पुन्हा दोषी आढळल्यास कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सध्या मराठी शिकल्याबद्दलची प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांना केवळ व्यवहारापुरते ते ज्ञान येत असल्याचे मानले जाईल. त्याला पूर्ण मराठी आली असा त्याचा अर्थ होत नाही असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर जे जे नवीन चालक परवाना मागतील, त्यांना त्यासाठी मराठी येणे अत्यावश्यकच असून ते येत नसेल तर त्याला तसा परवाना दिला जाणार नाही, अशा सक्त सूचना देखील परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर