दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात आता प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्र
दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात आता प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्र
मुंबई-: नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये ‘शासन प्रक्रिया पुनर्रचना’ राबविण्यात येणार असून, या विभागाच्या पूर्वीच्या १५ सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता १० करण्यात आली आहे.
दस्तनोंदणी, विवाह नोंदणी आणि प्रमाणित नकला मिळविण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण बदल केला.
या नव्या प्रणालीनुसार, समान स्वरूपाच्या अनेक सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. संगणकीकृत प्रणालीतून दस्तांची प्रमाणित नक्कल देण्याच्या तीन वेगवेगळ्या सेवा एकत्र करून त्यांची एकच सेवा तयार करण्यात आली आहे, तर विशेष विवाह कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन सेवांचेही एकत्रीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करणे आणि सीलबंद मृत्यूपत्राचा लखोटा जमा करणे यांसारख्या सेवा आता काढून टाकण्यात येणार आहेत.
महत्त्वाचे बदल आणि वैशिष्ट्ये
• कागदपत्रांची संख्या कमी : नागरिकांना आता वारंवार तीच कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. डिजीलॉकर, आधार, पॅन आणि भूमी अभिलेख यांसारख्या शासकीय प्रणालींशी ही सिस्टीम जोडली जाणार असल्यामुळे आवश्यक माहिती आपोआप घेतली जाईल.
• प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्र : ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही, तेथे नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे.
• शुल्कातील महत्त्वाचे बदल : काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या ‘गृहभेटीचे’ सध्याचे ३०० रुपये शुल्क वाढवून ते ५००० रुपये करण्यात आले आहे. यासोबतच अभिलेख शोधासाठीचे दरही नव्याने सुचवण्यात आले आहेत.
• वेळेची बचत : दस्तनोंदणी आणि नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करणे यांसारख्या सेवा आता केवळ १ दिवसात पूर्ण केल्या जातील, अशी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ही संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’ पोर्टलशी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीचे API द्वारे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya