Breaking News
जगन्नाथराव हेगडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित!
मुंबईचे माजी नगरपाल आणि लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांचा महाराष्ट्र टाइम्स या अग्रगण्य दैनिकाने प्राइड ऑफ महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राचे भूषण म्हणून निवड केली आहे डॉ हेगडे यांनी महाराष्ट्रातील विविधसंस्था मधून महत्वाच्या पदावर कार्य करीत एक समाजसेवी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गरिबांची सेवा केली आहे अनेक मंडळांना आर्थिक हातभार लावून सहकार्य केले आहे लायन्स क्लब च्या माध्यमातून समाजसेवेचे प्रचंड मोठे जाळे विस्तारित केले आहे त्यांच्या कार्याची दखल इंग्लंड च्या संसदेने घेऊन त्यांना हाउस ऑफ कॉमन्स मध्ये सन्मानित केले होते. आणि आता त्यांच्या कार्याची दखल आता महाराष्ट्र टाइम्स ने घेऊन त्यांच्या समाजसेवेचा उचित गौरव केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar