शालेय विद्यार्थ्यांसाठी वही-पेन वाटप कार्यक्रम संपन्न
शालेय विद्यार्थ्यांसाठी वही-पेन वाटप कार्यक्रम संपन्न
लायन्स क्लब मिडटाऊन व WHRAF चा स्तुत्य उपक्रम
मुंबई - लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 1, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन आणि वर्ल्ड वाईड ह्युमन राईट्स अॅण्ड अँटी करप्शन फोरम (sंप्RAइ) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 22 जुलै 2025 रोजी नवी प्रभादेवी येथील अग्री समाज हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेन सेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन sंप्RAइ चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे आणि लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शरिफ मुंबई आणि आमदार डॉ. जगन्नाथराव हेगडे, शिवसेना आमदार श्री. महेश सावंत आणि माजी महापौर श्री. महादेव देवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये - लायन जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, राष्ट्रीय अध्यक्ष sंप्RAइ आणि सचिव, लायन्स क्लब मिडटाऊन, लायन ज्योती भोसले, sंप्RAइ महाराष्ट्र सचिव व लायन्स क्लब मिडटाऊनच्या पहिल्या उपाध्यक्ष, लायन विजय रायमाने, डिस्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन, श्री. संजय भगत, शिवसेना शाखाप्रमुख, लायन नंदकुमार बगवे, sंप्RAइ मुंबई सचिव व लायन्स क्लब मिडटाऊनचे संयुक्त सचिव, लायन महेश आंब्रे, sंप्RAइ मुंबई सचिव, लायन साई गोपाळ चिल्का, sंप्RAइ मुंबई सचिव, श्री. लक्ष्मण भोसले, समाजसेवक, श्री. लितेश केरकर, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये अनेक गरजू शालेय विद्यार्थ्यांना वही आणि पेन सेटचे मोफत वाटप करण्यात आले. समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम सर्वच स्तरांतून गौरवला जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya