पुण्यात धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकी नागरिकाला अटक
पुण्यात धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकी नागरिकाला अटक
पुणे - पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. ‘येशूला देव माना इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल’ असं म्हणून पिंपरी कॅम्प इथं धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफर जाविन जेकॉब, स्टीव्हन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह १६ वर्षीय बालकाचा यात समावेश आहे. पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक असलेल्या शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हा हिंदू धर्मातील नागरिकांच ख्रिचन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता.
नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन येशू विषयी माहिती दिली जात होती. ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे, हे सांगितलं जातं होतं. ‘ख्रिचन धर्म वगळता कुठलाच धर्म महत्त्वाचा नाही. या विश्वासात केवळ येशूच आहे. इतर धर्म केवळ कथा आहेत. इतर देवतांना न मानता तुम्ही येशूला माना, पुढे तुम्हाला आर्थिक मदत करतो’ असे सांगून नागरिकांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिक असलेला स्थिव्हन कदम करत होता. ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य लाभेल, असं नागरिकांना पटवून दिले जात होतं. पैशांचा देखील आमिष दाखवला जात होतं.
याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिकाला अटक केली आहे. अमेरिकन नागरिक शेफर जेकॉब हा एक वर्षाच्या मुदतीवर भारतात आलेला आहे. पोलिसांनी तुर्तास नोटीस देऊन सोडून दिलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya