Breaking News
लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे ...
लोणावळा: थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या लोणावळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता रस्त्याने घरी निघालेल्या एका तरुणीला तीन अज्ञात नराधमांनी त्यांच्या कारमध्ये ओढून बसवले आणि कार लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी नेऊन तिन्ही नराधमांनी तरुणीवर शनिवारी पहाटेपर्यंत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरातील एका 23 वर्षीय पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणी ही शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीतील एका रस्त्याने जात असताना कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने कारमध्ये ओढून बसवले. त्यानंतर त्यांनी तिचे हात मागे बांधून तिचा मोबाईल काढून घेतला व तिला विवस्त्र करून हाताने मारहाण करत चालत्या कारमध्ये तसेच काही ठिकाणी कार थांबवत शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी पहाटेपर्यंत आळीपाळीने बलात्कार केला असल्याची फिर्याद पिडीत तरुणीने दिली आहे. तसेच बलात्कारानंतर नराधमांनी तिला घटनास्थळावरून कारमध्ये घेऊन येत लोणावळ्यातील नांगरगाव येथील रस्त्याच्या कडेला टाकून देत फरार झाले आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली. पीडीत तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन तसेच घटनास्थळ व परिसरातील रस्त्यांवरील काही तांत्रिक बाबींची पाहणी केली आणि अवघ्या 12 तासांच्या आत याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
दरनियीव, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे हे करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे