ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीला फ्रैंकिंग मशिन सुविधा
ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीला फ्रैंकिंग मशिन सुविधा
सर्व सभासद व इतर सहकारी पतसंस्थांना मिळणार लाभ
सातारा - महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची तसेच महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण व सहकार महर्षी हे पुरस्कार प्राप्त सहकारी संस्था ज्ञानदीप को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेस नुकताच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने फ्रैंकिंग मशिन वापराचा परवाना प्राप्त झाला आहे. संबंधित विभागाचे पुणे येथील मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडून तो मिळाला असून ज्ञानदीप पतसंस्था ही फ्रैंकिंग परवाना प्राप्त करणारी पहिलीच पतसंस्था ठरली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांनी दिली.
ज्ञानदीप पतसंस्थेला मिळालेल्या या परवान्यामुळे संस्थेच्या 3 लाख पेक्षा जास्त सभासदांची कर्ज वाटप प्रक्रिया जलद होऊन वेळेत आर्थिक गरज पूर्ण केली जाणार आहे. यामुळे इतर पतसंस्थांची सोय होणार असून त्यांचेही कर्जवाटप जलद होण्यास मदत होणार आहे.
संस्थेने दि. 30 जून 2025 अखेर रुपये 6 हजार 700 कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 3776 कोटी असून कर्ज 2924 कोटी मिळून संमिश्र व्यवसाय 6700 कोटी झाला आहे. सक्षम कर्ज वाटप कर्ज वसुलीमधील सातत्य व निश्चित केलेल्या कर्ज वसुली आणि कर्ज वितरण धोरणांची अंमलबजावणी यामुळेच संस्थेच्या नेट एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. ज्ञानदीपच्या संपूर्ण महाराष्ट्रात 110 शाखा, 8 विभागीय कार्यालय, 5 सुसज्ज प्रशिक्षण केंद्र असून 995 कर्मचारी व 1238 दैनंदिन ठेव प्रतिनिधी कार्यरत आहेत. ग्राहकांची गरज ओळखून आकर्षक ठेव व कर्ज योजना उपलब्ध करून देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
संस्थेचे एकूण 3 लाख 9 हजार सभासद असून त्यांना कर्ज वितरण करण्यासाठी फ्रैंकिंगकरता अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे संस्थेने फ्रैंकिंग मशीन उपलब्ध करून द्यावे म्हणून वारंवार सहकार विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग येथे पत्रव्यवहार केला. संस्थेच्या सतत पाठपुराव्यामुळेच संस्थेला दि. 3 जुलै 2025 रोजी नवीन फ्रैंकिंग मशीनच्या वापरास मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकरी, नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी मंजुरी दिली आहे.
संस्थेला नवीन फ्रैंकिंग मशीन परवाना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुंबई जिल्हा बँक, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक व अध्यक्ष तसेच पतसंस्था नियामक मंडळाचे सदस्य जिजाबा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आ. प्रवीण दरेकर यांचे आभार व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya