Breaking News
NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव
सांगली - सांगलीच्या आटपाडी येथील नेलकरंजीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे. साधना भोसले यांची मुलगी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत सराव परीक्षा झाली आणि त्या सराव परीक्षेत तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले आणि त्यांनी मुलीला मारहाण केली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबती साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसापूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. साधनाचे वडील मुख्याद्यापक धोंडीराम भोसले हे कमी गन मिळाल्यामुळे संतापले होते. नीट परीक्षेत कमी गुण मिळाले? असे विचारात तिचं वडिलांनी तिला जात्याच्या लोखंडी खुट्याने रात्री मारहाण केली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी ते योग्य दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी आल्यानंतर साधनाच्या वडिलांना ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होते. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु डॉक्टर बनण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पित्यास अटक केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे