रुग्ण मदत कक्षाचा बॉम्बे हॉस्पिटलला दणका – धर्मादाय हॉस्पिटल असूनही रुग्णांकडून लाखो रुपये वसूल!
रुग्ण मदत कक्षाचा बॉम्बे हॉस्पिटलला दणका – धर्मादाय हॉस्पिटल असूनही रुग्णांकडून लाखो रुपये वसूल!
मुंबई -बॉम्बे हॉस्पिटलसारख्या धर्मादाय नोंदणीकृत संस्थेकडून एका गंभीर रुग्णावर उपचार करत असताना, अडीच लाख रुपये भरल्याशिवाय ऑपरेशन न करण्याची अट घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पेशंटच्या नातेवाईकांनी कर्ज काढून, मदतीचा हात मागून दोन लाख ३२ हजार रुपये जमा केल्यावरच त्याचे ऑपरेशन करण्यात आले.
त्यानंतर धर्मादाय कार्यालयातून अधिकृत पत्र दिले गेले असतानाही, दोन महिन्यांपासून हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट, पेशंट आणि त्याच्या कुटुंबियांवर मानसिक दबाव आणत, डॉक्टर आणि नर्सेसने सुध्दा पैसे भरण्याचा तगादा लावला.
या प्रकाराची माहिती रुग्ण मदत कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राम कदम यांना मिळताच, त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बॉम्बे हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब विचारला. “धर्मादाय हॉस्पिटल असूनही रुग्णांकडून पैसे वसूल करून मानसिक छळ करणे अत्यंत निंदनीय आहे,” असे स्पष्ट मत राम कदम यांनी व्यक्त केले.
या वेळी बॉम्बे हॉस्पिटल मधील MSW अधिकारी, बिलिंग विभागाचे प्रमुख व इतर बिलिंग कर्मचारी रुग्णाच्या कुटुंबियांना धमकावत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या घटनांवर आळा बसावा यासाठी आंदोलनाचा इशारा रुग्ण मदत कक्षाने दिला आहे.
या आंदोलनात लोककल्याण वैद्यकीय पक्षाचे शशिकांत लिंबारे, संदीप वायरकर महाराष्ट्र सदस्य, निलेश राणे, समाजसेवक नितीन कोलगे, संतोष चौगुले, पत्रकार दीपक राऊत आणि इतर अनेक मान्यवर सहभागी होते.
रुग्णांवर होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी आणि धर्मादाय हॉस्पिटलमध्ये पारदर्शकता यावी यासाठी रुग्ण मदत कक्ष आणि संबंधित संस्थांनी तत्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya