NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या कारला लंडनमध्ये खलिस्तान्यांचा घेराव

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या कारला लंडनमध्ये खलिस्तान्यांचा घेराव

लंडन - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या कारसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल संध्याकाळी एस. जयशंकर लंडनमधील चॅथम हाऊसमधील एका बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते बाहेर पडत असताना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तान समर्थक घोषणाबाजी देत होते. कारमध्ये बसत असताना समोरच्या आंदोलकांमधून एक खलिस्तान समर्थक त्यांच्या कारसमोर आला आणि त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडला. यानंतर तिथे उभ्या असलेल्या लंडन पोलिसांनी त्याला बाजूला नेलं आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा ताफा पुढे रवाना झाला. मात्र, या प्रकारामुळे भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.

खलिस्तान समर्थक तिरंगा फाडताना दिसताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि गाडीतून दूर नेले. दुसरीकडे, काही लोक हातात खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भारतीय समुदायात संताप आहे.

या घटनेनंतर लंडनमध्ये भारतीयांनी निदर्शने केली. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोक ब्रिटिश सरकारकडे करत आहेत. भारत सरकारनेही हा मुद्दा राजनैतिक पातळीवर उपस्थित करणे अपेक्षित आहे.परदेशात खलिस्तान समर्थक यापूर्वीही भारतविरोधी कारवाया करत आहेत. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये भारतीय दूतावासाबाहेर अशा घटना घडल्या आहेत, ज्यावर भारत सरकारने आधीच निषेध व्यक्त केला आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट