लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी बस कोसळली कुमशेत घाटात.
लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी बस कोसळली कुमशेत घाटात.
महिला
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला आज गालबोट लागले. आजच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आलेली बस कुमशेत घाटात कोसळली.
ही बस चांदोरे येथून मोरबे येथील कार्यक्रमाला जात होती. या अपघातात १ महिला गंभीर तर इतर ८ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. रजनी रमेश डवले या महिलेच्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागला असून गंभीर दुखापत झाली आहे. लाडक्या बहिणी सक्षमीकरण कार्यक्रमासाठी रानवडे येथुन कुमशेत मार्गे माणगांवला जाणार होती ही बस होती.
या बस मध्ये एकूण २९ महिला एक ग्रामपंचायत कर्मचारी आणि ड्रायव्हर असे एकूण ३१ प्रवासी प्रवास करीत होते.जखमीपैकी ९ प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगांव येथे हलविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya